1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

मलीगटानी सूप

मलीगटानी सूप पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : अर्धी वाटी मसूर डाळ, एक कांदा, अर्ध्या लिंबाचा रस, तीन कप पाणी, एक क्यूब सूप स्टॉक, एक चमचा बटर, एक चमचा धने, एक चमचा जिरं, दोन-तीन मिरे, खसखस एक चमचा, चार लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, नारळाचं दूध दीड कप, शिजलेला भात अर्धी वाटी, चिमूटभर हिंग व हळद.

कृती : कांदा चिरून लोण्यावर परतून व त्यावर डाळ धुऊन परतावी. त्यातच मिरे, लसूण व मिरची घालावी. हिंग, हळद घालावी व तीन कप पाणी घालून मऊ शिजवावी. मग हे पाणी गाळून उरलेल्या डाळीपैकी थोडीशी घोटून त्या पाण्यात घालावी. आता या पाण्यात एक सूप क्यूब व धने, जिरं, खसखस यांची पेस्ट करून घालावी. मीठ, साखर, लिंबूरस घालून उकळल्यावर नारळाचं दूध घालून थोडं गरम करावं. उतरवल्यानंतर एक चमचा भारत प्रत्येक बाऊलमध्ये घालून त्यावर हे सूप ओतून द्या.