बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (17:16 IST)

जो क्षण वर्तमानात तोच आपला

सुटतय हातून काही,उमगे मनास,
धरता येत नाही, आहे खूप आस,
आठव येत राहते, प्रत्येक क्षणी,
खुणावती सतत गत आठवणी,
जो क्षण वर्तमानात तोच आपला,
घालवावा त्यास असा, तोच उरला,
काय होणार पुढं हे आत्ता विचारात कशास!
जगून घ्यावं भरपूर, अश्या वेळेस,
संचय करावा अनमोल आठवणींचा,
येईल कामास त्या, जेव्हा नसेल संग आपुल्यांचा!
अश्विनी थत्ते....