1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (20:40 IST)

कौतुक केल्याने हुरूप वाढतो

marathi poem
कौतुक केल्याने हुरूप वाढतो,
नवीन केल्याचा आंनद वाटतो,
आपलंच कुणीतरी असतं करणारं,
नव्यानं जाणीव करून देणारं,
अश्यानीच तर मिळते नवसंजीवनी,
हसत खेळत राहतो आनंद जीवनी,
परस्पर सम्बन्ध होतात मजबूत,
उत्साहास जणू येतो अचानक ऊत,
म्हणून आपणही जाणीवपूर्वक अवलंबाव,
पाठीवर कौतुका ची थाप जरूर द्यावं!
.....अश्विनी थत्ते