मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (17:30 IST)

माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?

माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?
वरपांगी सोंग घेऊनच तो जगत असतो,
म्हणतात ना खायचे दात वेगळे अन दाखवाचे वेगळे,
त्यातच वरील मर्म दिसून येतं की सगळे!
का म्हणून पण असं वागायचं सतत ढोंगी,
फसवणूक इतरांची,जणू मिळालेली परवानगी,
आपण ही चुकतो, ओळखता यायलाच हवं,
जे जसं वागतात त्या भाषेत उत्तर द्यायला यायला हवं,
मग बसेल कुठंतरी आळा, असं समजू या,
जगायची ही नवी पद्धत आपण ही शिकू या!
...अश्विनी थत्ते