Marathi Poem : इवलेसे रोप होतो, वाढलो मी जोमानं
इवलेसे रोप होतो, वाढलो मी जोमानं,
मोठा वृक्ष झालो, हिरवा झालो मनानं,
फांदी फांदी डवरली , बहरली फुलांनी,
कित्येक प्रणय फुलले,गजबजली घरटी चिवचिवाटानी,
मग हळूहळू वळलो, निष्पर्ण जाहलो,
झाड होतो म्हणून मनानी हिरवाच राहिलो,
वठलेल्या खोडावर छत्र्या आपसूकच उगवल्या,
कामी येऊ कुणाच्या तरी, वाट त्याही बघू लागल्या,
त्याही जातील निघून, मग माझं सरपण होईल,
जळून खाक होईन, पण भूक कुणाची तरी भागविन!
....अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi