बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (21:43 IST)

एकांत मिळावा, कधी कधी असं वाटत मला...

nature kavita
एकांत मिळावा , कधी कधी असं वाटत मला,...
चार क्षण घालवावे स्वतः साठी निवांत,
वावरावे  अस ,जसं आपल्याला वाटत, 
एकांत मिळावा, कधी कधी असं वाटतं मला,
उगाच लोळत पडावं, हाती एखादं  पुस्तक असावं,
आवडत्या गाण्याची धून, ऐकत राहावं,,
एकांत मिळावा,कधी कधी असं वाटतं मला,
मऊ जुने आवडते कडपे असावेत अंगावर,
नसावं आजूबाजूला कुणी म्हणणार, असं जर न तसं कर,
एकांत मिळावा, कधी कधी असं मला....,
एखादा प्रसंग आठवून पुन्हा खळखळून हसावं,
हातून सुटलेल्या काही गोष्टीं साठी मनमुराद वाटत रडावं,
एकांत मिळावा, कधी कधी वाटत असं मला....,
भांडाव स्वतःशीच, का हे घडलं म्हणून,
मागवा जाब, तेव्हां का नाही बोलले म्हणून,
एकांत मिळावा, कधी कधी वाटत अस मला ..,
कदाचित मिळतील उत्तरं, अनुत्तरीत प्रश्नांची,
उलगडेल अढी, गुंतलेल्या माझ्या नात्याची,
एकांत मिळावा, कधी कधी  असं वाटतं मला ...!
..अश्विनी थत्ते.