मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

सांगलीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे

गणपती मंदि
MH GovtMH GOVT
सांगलीतील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. सांगलीचे राजे अप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर बांधले. त्याचे बांधकाम १८११ साली सुरू झाले. ते १८४४ साली संपले. स्वातंत्र्य संग्रामातही या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक महत्त्वाच्या बैठका याच मंदिरात झाल्या. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या स्वातंत्र्य प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या नेत्यांची बैठकही याच मंदिरात झाली होती.

मिरजेचा दर्ग
सांगली व मिरज ही जोडशहरे आहेत. या मिरजेचा दर्गा प्रसिद्ध आहे. जवळपास पाचशे वर्षांपूर्वी तो बांधला. ख्वाजा मीरसाहेब दर्गा या नावाने तो ओळखळा जातो. हा दर्गा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. विविध धर्माचे भाविक येथे येऊन आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस करतात. या दर्ग्यातर्फे दरवर्षी एक सांगितिक महोत्सव होतो. त्यात आपली कला रूजू करण्यासाठी नामवंत कलाकारही उत्सुक असतात.

हरीपू
सांगलीजवळ असलेल्या हरीपूर येथे वारणा व कृष्णा या नद्यांचा संगम होतो. या संगमाजवळच संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे प्रत्येक सोमवारी हजारोंच्या संख्येने भाविक येथे येतात. हा परिसरही अतिशय रम्य आहे.

औदूंब
दत्तात्रेयाचे अवतार समजले जाणारे श्री नरसिंह सरस्वती यांची तपोभूमी म्हणून औदुंबर ओळखले जाते. हे गाव अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसले आहे. निसर्गाच्या हिर्व्या गर्दीतून वाट काढत वाहणारी कृष्णा नदी आणि तिच्या काठाला अतिशय शांत वातावरणात दत्तात्रेयाचे मंदिर हे पाहिल्यानंतर या स्थानाला तपोभूमी का म्हणतात हे कळते. येथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.

प्रचितगड आणि चांदोली अभयारण्
छत्रपती शिवाजी महाराजांच्य काळात प्रचितगडाची बांधणी झाली. सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. चांदोली धरण हेही पर्यटनासाठी चांगले स्थळ आहे. हे धरण वारणा नदीवर बांधले आहे. या धरणाच्या परिसरात जंगल आहे. त्याला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

तासगा
सांगलीजवळ असलेले तासगाव ऐतिहासिक परंपरा सांगणारे गाव आहे. पटवर्धन राजघराण्यातील एक पाती येथे राज्य करत होती. येथील गोपूर असलेले गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. दक्षिणेत असलेली गोपूरांची परंपरा महाराष्ट्रात पाहून हे मंदिर वेगळे वाटते. येथील गणेश मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवात येथे भव्य रथयात्रा काढली जाते.

बत्तीस शिराळ
नागपंचमी आली की बत्तीस शिराळ्याची आठवण होत नाही, असे कधी होतच नाही. कारण नागांचे गाव हीच बत्तीस शिराळ्याची ओळख आहे. यावेळी नागांची मिरवणूक काढण्यात येते. शिवाय सर्वांत उंच फणा काढणारा नाग म्हणून स्पर्धाही होते. येथे विविध नाग मंडळेही आहेत.

दांडोब
मिरज व कवठे महंकाळ या दोन तालुक्यांच्या सीमेवर दांडोबाचे जंगल विखुरले आहे. दंडकारण्य म्हणून पुराणात जो उल्लेख आढळतो तो याच अरण्याचा असे म्हटले जाते. येथील टेकडीवर शंकराचे एक जुने मंदिरही आहे.