Kitchen Tips and Tricks: स्वयंपाकघरातील चिकट भांडी चहापत्तीने कसे स्वच्छ करावे जाणून घ्या
प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या घराचे स्वयंपाकघर खूप महत्वाचे असते. ज्याला ती खूप काळजीने सजवते आणि त्यात मोठ्या प्रेमाने स्वयंपाक करते. किचन कितीही स्वच्छ केले तरी काही दिवसातच किचनमध्ये ठेवलेले डबे चिकटू लागतात. त्यांच्यावर तेलाचा विचित्र थर जमा होतो. त्यांची काळजी न घेतल्यास डब्यांवर ग्रीसचा थर साचतो. जे काढण्यासाठी तासनतास हाताने घासावे लागते.
स्वयंपाकाघरातील डबे स्वच्छ करण्याची सोपी युक्ती आहे ज्यांना अवलंबवून डबे सहजपणे स्वच्छ करता येतात.या साठी वापरलेली चहापत्ती लागेल. वापरलेल्या चहा पत्ती चा वापर करून चिकट भांडी स्वच्छ करू शकता.
कसे वापरायचे -
लोक एकतर उरलेली चहाची पाने फेकून देतात किंवा झाडे आणि वनस्पतींमध्ये टाकतात. पण त्याचा वापर करून तुम्ही चिकट डबे ही साफ करू शकता. यासाठी चहा बनवल्यानंतर उरलेली चहाची पत्ती लागणार आहेत. इतकंच नाही तर स्निग्ध भांडी साफ करण्यासाठी तुम्हाला उरलेली चहापत्ती ही लागतील.
सर्वप्रथम चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती पुन्हा एका भांड्यात उकळा.
आता हे पाणी गाळून त्यात दोन चमचे लिक्विड डिशवॉशर टाका.
या पाण्याने तुम्ही चिकट झालेले डबे आणि भांडी धुवू शकता.
या टिप्सच्या मदतीने तुमची भांडी काही वेळात धुतली जातील.
चहाची पत्ती फक्त बागकामासाठी वापरली जात नाहीत. याच्या मदतीने डब्याबरोबरच अनेक प्रकारची भांडीही स्वच्छ करता येतात. काचेच्या वस्तूंवरील डाग काढून टाकण्यासाठी चहापत्तीचा वापर केला जाऊ शकतो.
काचेची भांडी अशा प्रकारे स्वच्छ करा -
यासाठी सर्वप्रथम चहा बनवल्यानंतर उरलेली चहाची पत्ती पुन्हा एका भांड्यात उकळा. आता हे पाणी गाळून नंतर त्यात दोन चमचे लिक्विड डिशवॉशर टाका. या पाण्याने तुम्ही काचेची भांडी धुवू शकता.
Edited By - Priya Dixit