सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (16:07 IST)

आपल्या मुलांना देखील असेल नखे चावण्याची किंव पाय हालवण्याची सवय तर नक्की वाचा

आपल्या मुलाला पाय हालविण्याची किंवा नखे चावण्याची सवय असल्यास अशा प्रकारे नियंत्रित करा. बऱ्याच वेळा मुलांना जाणता-नजाणता नखे चावणे, अनावश्यकपणे पाय हालवायची किंवा दात चावण्याची सवय लागते. पालक या सवयी ला सहजपणे घेऊन दुर्लक्ष करतात, जे योग्य नाही. वैद्यकीय भाषेत ह्याला स्टीमिंग असे म्हणतात. ह्याचा अर्थ आहे की विचार न करता एकच काम करीत राहणे. बऱ्याच काळ असं केल्याने आरोग्यास हानी होते. चला तर मग जाणून घेऊ या की मुलांमधील या सवयीला कसे नियंत्रणात करू शकतो. 
 
स्टीमिंग काय आहे?
स्टीमिंग म्हणजे नखे चावणे, केसांना फिरवणे,हात पाय हालवणे,बोट मोडणे, किंवा चुटकी वाजवणे. जिथे या सर्व सवयी मोठ्यांमध्ये तणावाचे संकेत देतात तर मुलांमध्ये या सवयीला ऑटिझमशी जोडले जातात. जर पालकांनी वेळेच्या वेळी या सवयीं कडे लक्ष दिले तर त्यांची ही सवय सोडवता येऊ शकते. नाही तर खालील या समस्या उद्भवू शकतात...
 
1 घाणीने भरलेले नखे जेव्हा तोंडात जातात तर या मुळे मुलां मध्ये पॅरोनीशिया संक्रमण, दात कमकुवत,हिरड्यांचे आजार, गैस्ट्रोइंटेस्टाइनल संक्रमण, अतिसार आणि पोटदुखी ची समस्या होऊ शकते. 
 
2 पाय हालविण्याचा सवयी मुळे सतत पायात वेदना खळबळ, तणाव, जडपणा, कमकुवत स्नायू आणि पायात टोचण्या सारखे अनुभव येतात. या मुळे सांधे कमकुवत आणि रक्त परिसंचरण मध्ये बिघाड होण्याची भीती देखील असते.
 
3 बऱ्याच काळ बोट मोडल्याने संधिवात सारखे रोग उद्भवू शकतात. खरं तर हे हाडे एकमेकांना जोडलेले असतात आणि बोटे मोडल्याने या मधील द्रव्य कमी होऊ लागतो, या मुळे मुलं या आजाराला बळी पडतात.
 
मुलांमधील स्टीमिंग कशी नियंत्रित करावी ?
* नखे चावण्याची सवय -
मुलांच्या बोटांना कडुलिंबाचे किंवा लवंगांचे तेल लावा. ह्याची चव कडवट असल्याने मुलांमधील नखे चावण्याची सवय सुटेल.
 
* चुटकी वाजविण्याची किंवा बोटे मोडण्याची सवय -
मुलांना या सवयी पासून दूर ठेवण्यासाठी त्यांना व्यस्त ठेवा. त्यांच्या कडून ड्रॉईंग करवावे किंवा हाताच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटी करवा. जर मुलं टीव्ही बघताना किंवा वाचताना असे करत असतील तर त्यांना खाण्यात व्यस्त ठेवा.
 
* पाय हालविताना त्वरितच रोका - 
जसेच मुलं पाय हालवू लागले त्यांना टोकून द्या. पुन्हा -पुन्हा हेच करून त्यांची सवय दूर होईल असे ही असू शकते की मुलं तणावाच्या खाली असे करत असतील. त्यांना तणाव मुक्त ठेवण्यासाठी शारीरिक क्रिया कलाप जास्त करवावे जेणे करून ते व्यस्त राहतील.
 
* योगाने तणाव दूर होईल -
आपले मुलं वारंवार केसांशी खेळतो तर त्याला असे करण्यास नाही म्हणा आणि समजवून द्या की हे चुकीचे आहे. सुरुवाती पासूनच मुलांना तणावमुक्त आणि ताण व्यवस्थापन करण्यासाठी योगा करवावे.