शनिवार, 28 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified रविवार, 6 जून 2021 (09:00 IST)

या चुकीच्या सवयी नात्यात दुरावा आणतात.

बर्‍याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात, त्यातील काही चांगल्या सवयी असतात तर काहींमध्ये वाईट सवयी असतात. परंतु काळानुसार आपण या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत कारण आपण त्या बदलल्या नाहीत तर आपल्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जेव्हा आपण लग्न करतो आणि जर आपण या वाईट सवयी बदलल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम आपल्या नात्यावर होतो. या सवयी मुळे भांडणे होतात जे विकोपाला जातात. म्हणूनच वेळीच वाईट सवयी बदलून घ्या.जेणे करून आपल्या दोघांचे आयुष्य सुखाचे जाईल.चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या सवयी बदलून घेतल्या पाहिजे. 
 
* एकमेकांचा आदर न करणे -बऱ्याच लोकांना अशी सवय असते की ते कोणाचा आदर करत नाही स्वतःमध्येच व्यस्त असतात.असं करू नये. आपल्या जोडीदाराला नेहमी आदर द्या. आपल्याला त्यांच्यासमवेत अवघे आयुष्य काढायचे आहे.म्हणून त्यांना आदर द्या.एकमेकांना आदर दिल्याने आपले नाते दृढ होतील.एकमेकांवर विश्वास वाढेल.म्हणून एकमेकांना आदर द्या.
 
*  रागावू नका-असं म्हणतात की राग हा माणसाचा मोठा वैरी आहे. एखादा माणूस रागाच्या भरात नको ते बोलून बसतो आणि नंतर त्याला पश्चाताप होतो.परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही.नात्यात दुरावा निर्माण होतो.कोणत्याही गोष्टीवर राग न करता प्रेमाने त्याला हाताळा.
 
* टोमणे देऊ नका-काही लोकांना सवय असते प्रत्येकाला टोमणे मारायची,कधी विनोदाच्या स्वरूपात तर कधी वास्तविकतेत.कोणालाही टोमणे मारणे योग्य नाही मग तो आपला जोडीदाराचं असो.आपले टोमणे एखाद्याचे मन देखील दुखावू शकतात हे लक्षात ठेवा.या मुळे आपले नाते दुरावले जाऊ शकते.म्हणून जर आपल्याला देखील एखाद्याला टोमणे मारायची सवय आहे तर ही सवय ताबडतोब बदलून टाका.
 
* जोडीदाराला साथ द्या-आपल्या जोडीदाराला कधीही कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू नका.त्यांना नेहमी त्यांच्या सुखात दुःखात साथ द्या. एकटेपणा देखील नात्यात दुरावा आणतो.म्हणून त्यांच्या समवेत जास्तीत जास्त वेळ घालवा.