सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (13:46 IST)

कोरोना काळात मुलांना घेऊन प्रवास करताना ही खबरदारी घ्या

सहसा आपण जेव्हा प्रवास करता तर ह्याची पूर्व तयारी करतो. पण जेव्हा गोष्ट येते मुलांसह प्रवास करण्याची तर अधिकच लक्ष ठेवावे लागते. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. या पासून वाचण्यासाठी लोक बाहेर देखील जात नाही पण आपल्याला देखील एखाद्या खास कारणामुळे मुलांसह प्रवास करावा लागत आहे. तर या साठी आम्ही आपल्याला काही महत्त्वाचा गोष्टी सांगत आहो  या गोष्टींचे अनुसरणं करून आपण मुलांसह सुरक्षितपणे आपल्या ठिकाणी पोहोचू शकता. 
 
* आपल्या मुलांशी बोला- 
आपल्या मुलांना कोरोना बद्दल माहिती आहे का? किंवा ते आपल्याला काही प्रश्न विचारात आहे, मग त्यांच्याशी बोला. पण लक्षात ठेवा या सर्व गोष्टी त्यांच्या वयानुसार असाव्यात. जर मुल एवढे मोठे आहे की त्याला सर्व गोष्टी समजत आहे तर त्याला व्यवस्थित पणे समजवा. कोविड- 19  पासून जे काही बचाव करण्यासाठी करावयाचे आहे ते त्याला सांगावे. त्याला सांगा की जरी हा एक गंभीर आजार आहे तरी त्याला लढा देणं शक्य आहे. 
 
* मास्क वापरणे आवश्यक आहे -
कोरोनाला रोखण्याचा बचाव करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मास्क आहे. जेव्हा आपण मुलांसह प्रवास करीत आहात तेव्हा त्याला मास्क आवर्जून लावा. या शिवाय आपण फेस शील्डचा वापर देखील मुलांच्या संरक्षणासाठी करू शकता. 
 
* मुलांच्या सर्व वस्तूंना वाईप करावं- 
जेवढ्या देखील भागात मुलांचे हात लागतात त्यांना हॅन्ड रब किंवा सेलाईन वॉटर ने स्वच्छ करा हे सीट च्या पुढे आणि मागील जागे सह आर्मरेस्ट, टेलिव्हिजन समाविष्ट आहे. जर आपण ओल्या कपड्याने पुसत आहात तर या मध्ये निर्जंतुक नाशक मिसळा. जर आपल्याकडे असे कोणते निर्जंतुक नाशक नाही तर फ्लाईट अटेंडंटला अतिरिक्त स्प्रे करण्यासाठी सांगा आणि मुलाच्या सभोवतालीचे क्षेत्र स्वच्छ करा.
 
* योग्य सीट निवडा- 
बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे की प्रवासाच्या दरम्यान विंडो सीट निवडणे योग्य नाही. पण जेव्हा आपण कोरोनाच्या काळात मुलांसह प्रवास करत आहात तर विंडो सीट निवडा. या मुळे विमानाच्या आत बसलेल्या कोणत्याही प्रवाशांकडून होणारा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
 
* वॉशरूम चा योग्य वापर -
जर मुलाला वॉशरूम जावे लागत असेल तर लक्षात ठेवा की टॉयलेट सीट देखील सेनेटाईझ होणं आवश्यक आहे. मुलाला स्वच्छतागृहाचा वापर करताना हे चांगल्या प्रकारे सेनेटाईझ करावं. 
 
* सेनेटाईझरचा वापर- 
मुलांसह प्रवास करताना सेनेटाईझर चा वापर करणे एक महत्त्वाचा टप्पा आहे.आपण आपल्यासह 2 किंवा 3 प्रकारचे सेनेटाईझर आवर्जून ठेवा. या शिवाय हॅन्ड रब, नॅपकिन आणि वाईप्स ठेवणे विसरू नका. आपल्याला असे वाटत आहे की मुलाने एखाद्या क्षेत्राला हात लावले आहे तर त्याचे हात हॅन्ड सेनेटाईझर ने पुसून घ्या. 
 
* ट्रॅव्हल थर्मामीटर पॅक करा -
प्रवासाच्या दरम्यान एक थर्मामीटर पॅक करणे नेहमीच चांगला पर्याय आहे. विशेषतः कोरोनाकाळात जेव्हा आपण मुलांसह प्रवास करत आहात. तसेच मुलांच्या मूलभूत औषधे ठेवायला विसरू नका.
 
* बाहेरचे खाणे टाळा -
कोरोनाच्या विषाणूंचा धोका सर्वात जास्त बाहेरच्या खाण्यामुळे होऊ शकतो. आपण मुलांना बाहेरचे खाऊ घालू नका. घरातूनच त्याच्या साठी जेवणाचा डबा घेऊन जा. जर लांबच्या प्रवासाला जात आहात तर मुलांसाठी स्नॅक्स पॅक करू शकता. 
 
या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून मुलांसह प्रवास कराल तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरी जावे लागणार नाही आणि कोरोनाच्या भीतीमुळे आपला प्रवास देखील खराब होणार नाही.