गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 डिसेंबर 2020 (08:31 IST)

जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.
 
भाविकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन दिवस जेजुरीत येणे टाळावे. येथील व्यावसायिकांनी भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये. तीन दिवस खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील असे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी स्पष्ट केले.
 
मंगळवारी खंडोबा गडावर चंपाषष्टी उत्सव (देव दीपावली) सुरू होत आहे. या पाच दिवसाच्या काळात ग्रामस्थांना व भाविकांना नेहमीप्रमाणे मुखदर्शनाची सोय केलेली आहे. चंपाषष्ठीला सर्व ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या पूजा प्रथेप्रमाणे केल्या जातील. दर्शन मंडपामध्ये पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.