बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

महिलांनी का नाही करू दारूचे सेवन?

अल्कोहल घेतल्याने काही क्षणांचा आनंद तर मिळतो परंतू नियमित अल्कोहल सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर दिसू लागतात. महिलांनी अल्कोहल अधिक मात्रेत सेवन केल्यास त्यांना आरोग्य संबंधी समस्या जसे कर्करोग, मधुमेह आणि लिव्हरसंबंधी रोग होण्याचा धोका वाढून जातो. बघू या महिलांना का नाही करावे दारूचे सेवन:

* अल्कोहल शरीरातील पोषक तत्त्व शोषून घेतं. ज्या महिला अधिक मात्रेत अल्कोहलचे सेवन करतात त्या स्वस्थ आहार घेत नाही. सेवन केलेली दारू रक्तात राहून जाते ज्यामुळे शरीराला धोका निर्मित होतो.
 
* नियमित दारू पिण्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) होण्याचा धोका सामान्य महिलांपेक्षा अधिक असतो. 
 
* महिला गर्भावस्थेदरम्यान अल्कोहलचे सेवन करते तर तिच्या गर्भाला नुकसान होऊ शकते.

* असे मुले ज्यांची आई अल्कोहलचे सेवन करते, त्या मुलांमध्ये शिकण्याची आणि व्यवहार संबंधी समस्या विकसित होते. कधी-कधी अश्या महिलांना स्पेशल चाइल्ड अर्थात असामान्य मुलेदेखील जन्माला येतात. 
 
* नियमित अल्कोहल घेतल्याने मृत बाळं जन्माला येणे, वेळेपूर्वी डिलिव्हरी होणे, गर्भपात आणि वंध्यत्व सारख्या समस्या उद्भवू शकतात. 
 
* अनेकदा अश्या आईच्या मुलांना लहानपणापासूनच अल्कोहलची सवय लागून जाते कारण गर्भात असताना त्यांनी याचे सेवन केलेले असतात.

* पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अल्कोहल पचविण्याची क्षमता कमी असते.
 
* महिलांद्वारे अल्कोहलचे सेवन केल्याने त्यांच्या मासिक चक्रावर विपरित परिणाम होतो. 
 
* अल्कोहलमुळे पुरूषांपेक्षा महिलांच्या मेंदूला अधिक धोका असतो. तसेच यामुळे त्यांना लिव्हर संबंधी समस्याही झेलाव्या लागू शकतात. 
 
संशोधकांप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत महिला दारूवर अधिक निर्भर होऊन जातात. असेही पाहण्यात आले आहे की असे पुरूष आणि महिला ज्या नियमित अल्कोहलचे सेवन करतात त्यात महिलांमध्ये अल्कोहलिक (दारुडी) बनण्याची शक्यता अधिक असते.