नारळाचे लाडू
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक बाहेरचे खाणे टाळतात आहे, विशेषतः मिठाई. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोड-धोड खाण्याची इच्छा झाल्यावर आपण घरच्या घरात फक्त दोन वस्तूंचा वापर करून चविष्ट नारळाचे लाडू बनवू शकता. ते देखील मावा किंवा खवा शिवाय. चला तर मग नारळाचे लाडू बनविण्याची रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य -
400 ग्रॅम नारळाचे पावडर किंवा बुरा, 400 ग्रॅम कंडेस्ड मिल्क, 2 चमचे साजूक तूप, 1 कप दूध, 1 /2 चमचा वेलची पूड.
कृती -
सर्वप्रथम लाडू बनविण्यासाठी आपण कढईत दोन चमचे साजूक तूप घालून नारळाच्या पावडर किंवा बुरा चांगल्या प्रकारे मंद आचेवर भाजून घ्या. याचा रंग बदलल्यावर या मध्ये एक कप दूध मिसळा या मध्ये कंडेन्स्ड मिल्क घालून लाडूचे मिश्रण किंचित चिकट होई पर्यंत मध्यम आंचेवर भाजून घ्या. या मध्ये वेलची पूड मिसळा या मिश्रणाला थंड होऊ द्या, आता हाताला थोडंसं तूप लावून लाडू बनवा आणि नारळाच्या पावडर मध्ये गुंडाळा. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्या आणि स्वतः खा आणि इतरांना देखील द्या. या लाडूंना अधिक काळ चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.