गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

मटाराची (ग्रीन पीस) टेस्टी बर्फी

साहित्य - ग्रीन पीस 1 कप, 1/2 कप पिस्ता बारीक काप केलेले, 1/2 कप तूप, 3 चमचा मावा, 2 कप साखर, 3/4 कप वेलची पूड. 
 
कृती - सर्वप्रथम मिक्सरमध्ये हिरवे मटार आणि पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यावे. नंतर नॉन स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वाटलेले मटार घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात मावा घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यात साखर घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता दुसरीकडे एका ऍल्यूमिनियमाच्या ट्रेवर तूप लावावे. त्यात वेलची पूड आणि अर्धे पिस्ते घालून मिक्स करावे. आता या मिश्रणाला ट्रेमध्ये घालून पसरवून घ्यावे. वरून उरलेले पिस्ते घालून बर्फी गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर त्याला फ्रीजमध्ये ठेवावे. 2 तासाने त्याला बाहेर काढून त्याचे काप करावे.