शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (14:52 IST)

मटार रोल्स

साहित्य:
– हिरवे वाटाणे – एक मोठी वाटी
– उकडलेले बटाटे – दोन-तीन
– किसलेले चीज – दोन मोठे चमचे
– खोबरे – अर्धी वाटी
– हिरव्या मिरच्या – चार
– एका लिंबाचा रस
– अर्धा इंच आले
– एक बारीक़ चिरलेला कांदा
– मीठ
– साखर – चवीप्रमाणे
– तळण्यासाठी तेल
– पावचा बारीक चुरा – आवश्‍यकतेनुसार
कृती : – सर्वप्रथम उकडलेला बटाटा नीट बारीक स्मॅश करून घ्या.
– या स्मॅश केलेल्या बटाट्यात मीठ, साखर, लिंबू पिळून घ्या
– नंतर वाटाणा उकडून बारीक़ करून घ्या.
– त्यात किसलेले चीज, खोबरे, मिरची, आले, बारीक़ चिरलेला कांदा, मीठ, साखर व लिंबाचा रस पिळा.
– बारीक केलेल्या बटाट्याच्या सारणाच्या दोन छोट्या आकाराच्या पुऱ्या करून वाटाण्याचे सारण त्यात भरून रोल तयार करा.
– हा रोल पावाच्या चुऱ्यात घोळवून घ्या.
– तेलात मंद गुलाबी रंग येईपर्यंत हा रोल तळा.
– आता हा मटार रोल सॉसबरोबर सर्व्ह करा.