बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (11:45 IST)

थंडीत फायदेशीर आहे अंजिराचा शिरा

थंडीत जर तुम्ही ड्रायफ्रूट्स नसतील खाऊ शकत तर याचा शिरा नक्की बनवून खा. हा खाण्यात चविष्ट आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर जाणून घेऊ कसे बनवतात अंजिराचा हलवा. 
 
साहित्य  
200 ग्रॅम वाळलेले अंजीर  
3 मोठे चमचे साजुक तूप  
अर्धा कप बदाम पावडर  
पाव कप मिल्क पाउडर
4 मोठे चमचे साखर  
लहान चमचा वेलची पूड  
2 मोठे चमचे बदामाचे काप सजवण्यासाठी  
 
कृती  
सर्वप्रथम अंजिराला उकळत्या पाण्यात 3-5 मिनिट शिजवून घ्या. पाण्यातून काढून त्याला फूड प्रोसेसरमध्ये घाला. आता कढईत तूप गरम करून त्यात बदाम पूड 2 मिनिटापर्यंत भाजून घ्या. नंतर यात अंजीर, मिल्क पाउडर, अर्धा कप पाणी आणि साखर मिसळा. जोपर्यंत साखर विरघळणार  नाही त्याला त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्या. आता यात वेलची पूड घाला आणि सर्व्ह करताना बदाम काप घालून सर्व्ह करा.