सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मार्च 2023 (08:42 IST)

धण्याची पंजिरी : हा प्रसाद कसा बनवायचा हे जाणून घ्या, वाचा सोपी पद्धत

panjiri
साहित्य:
 
100 ग्रॅम अख्खे धणे, 100 ग्रॅम पिठीसाखर, लहान वाटी काप केलेले मखाने, 25 ग्रॅम कोरड्या खोबऱ्याचे तुकडे, काजू आणि बदाम, 2-3 वेलची, थोडे मनुके, 4-5 केशर काड्या, तूप (अंदाजे).
 
पद्धत:
 
*सर्वप्रथम कढईत अर्धा चमचा तूप गरम करा.
 
* आता धणे पूड घालून मंद आचेवर भाजून घ्या.
 
* धण्याचा सुगंध येऊ लागल्यावर ते विस्तवावरून काढून थंड करा.
 
*आता सर्व ड्रायफ्रुट्स भाजून बाजूला ठेवा.
 
* धणे  थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
 
* आता त्यात पिठीसाखर, तळलेले काजू आणि वेलची घालून चांगले मिक्स करा.
 
* केशराने सजवा.
 
* राजेशाही पंजिरी तयार आहे.
 
आता या प्रसादासोबत देवाला अन्न अर्पण करा.