गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (16:08 IST)

गोड खाण्याची इच्छा असेल तर चविष्ट अंजीर हलवा बनवा

halwa
Anjeer Halwa: आपल्या पैकी अनेकांना गोड खायला आवडत. काही लोकांना तर दररोज जेवण्यात गोडधोड लागतं.गोड खाण्याची इच्छा असल्यास चविष्ट अंजीर हलवा बनवा हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
अंजीर हलवा बनवण्यासाठी साहित्य 
250 ग्रॅम-भिजत घातलेले अंजीर  
250 ग्रॅम खवा
तूप - 4 टीस्पून 
वेलची - 4-5
दालचिनी - 1 
सुका मेवा (मिक्स्ड) - 1कप 
साखर - आवश्यकतेनुसार 
पाणी - आवश्यकतेनुसार (भिजवलेल्या अंजिराचे )
 
कृती- 
अंजीराचा हलवा बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप टाकून गरम करा. तूप पुरेसे गरम झाल्यावर त्यात दालचिनी आणि वेलची घाला. 
आता त्यात भिजवलेले अंजीर टाका आणि सर्व साहित्य नीट मिसळा. यानंतर सर्व साहित्य मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजवा.यानंतर, पॅनमध्ये   अंजीराचे पाणी मिसळा आणि हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे अंजीर मऊ होईपर्यंत शिजवा .आता साखर घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा. आता अंजीर चमच्याने मॅश करा. आता हलवा कोरडा होईपर्यंत शिजवा.हलवा चांगला शिजल्यावर त्यात खवा घालून सर्व साहित्य नीट ढवळून घ्यावे. यानंतर सर्व साहित्य 5 मिनिटे शिजवा. यानंतर हलवा थंड होऊ द्या. यानंतर वर बारीक चिरलेला काजू घालून सर्व्ह करा.