गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (11:34 IST)

कमळ काकडी कढी Kamal Kakdi Kadhi Recipe

साहित्य- 2 कमळ काकडी, 1 कप आंबट दही, 1 मोठा चमचा बेसन, 1 लहान चमचा मोहर्‍या, 5 कढी पत्ता, चवीनुसर मीठ
 
कृती - 
सर्वात आधी कमळ काकडी धुऊन, कापून मग कुकरमध्ये उकळून घ्या.
नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्या मोहर्‍या, कोरड्या लाल मिरच्या, कढी पत्ता टाकून फोडणी घाला. आता पॅनमध्ये दह्यात हळद टाका आणि शिजवा.
नंतर पाण्यात बेसन घोळून ते देखील शिजवून घ्या. बेसनमुळे कढी घट्ट होत असल्यास त्यात पाणी घालू शकता.
कढी उकळल्यावर त्यात कमळ काकडी घाला आणि जरा वेळ शिजू द्या.
आपण गरमागरम कढी भात किंवा पोळीसोबत सर्व्ह करु शकता.