गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

आंब्याचा शिरा

आंब्याचा शिरा
ND
साहित्य : 200 ग्रॅम रवा, 1 कप आंब्याचा रस, 1 कप साजुक तूप, 1/2 आंब्याचे लहान लहान तुकडे, काजू, पिस्ता, मनुका, 2 कप साखर, 1/2 कप नारळाचा भुरा, 1 चुटकी गोड रंग.

कृती : रवा तुपात खमंग भाजून घ्यावा. दोन चमचे तूप वेगळे काढून ठेवावे. भाजून झाल्यावर गरम दुधात चिमुटभर गोड रंग टाकून रव्याला वाफवून घ्यावे. वाफ आल्यावर त्यात आंब्याचा रस, नारळ घालून मंद आचेवर 2 मिनिटापर्यंत वाफवावे नंतर त्यात साखर घालून पुन्हा वाफ आणून त्यात आंब्याचे लहान लहान तुकडे, काजू, पिस्ता व मनुका टाकून गरमागरम सर्व्ह करावे.