साहित्य : रसगुल्ल्यांचे विविध रंगाचे छोटे बॉल (बाजारात स्वीटच्या दुकानात मिळतात.) एक लीटर दूध, खारीक, बदाम, काजू, पिस्ते यांची पावडर (जाडसर) चारोळ्या, केशरकाडय़ा, जरासे कॉर्नफ्लोअर (एक टेबलस्पून), वेलची पावडर, व्हॅनिला इसेन्स.
कृती : एका पातेल्यात एक लीटर दूध उकळत ठेवून ते अर्धा लीटर करावे व त्यात खारीक, बदाम, काजू, पिस्ते यांची पावडर, केशरकाडय़ा, वेलची पावडर घालावी. थोडय़ा कोमट दुधात कॉर्नफ्लोअर मिसळून ते मिश्रण वरील दुधात घालावे. चारोळ्या तुपावर परतून दुधात घालाव्या व शेवटी व्हॅनिला इसेन्स व रसगुल्ले (रंगबिरंगी) छोटे छोटे घालावेत ते दुधावर तरंगतात व अशी कलरफुल बॉलची रबडी मुलांना खूप आवडेल!