1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

काकडीचा गोड केक

काकडीचा कीस
WD
साहित्य - दोन वाटी काकडीचा कीस, एक वाटी रवा, एक वाटी गूळ, अर्धा टे.स्पू. सोडा, चार टे. स्पू. लोणी, एक चमचा तूप, वेलची पूड आणि बदामाचे काप.

कृती - काकडी सोलून किसून घ्यावी. दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. रवा तुपावर किंचित भाजून घ्यावा. एका भांड्यात रवा, गूळ, काकडीचा कीस, लोणी, वेलची पूड हे सर्व जिन्नस एकत्र करावं. ओव्हन १८0 डिग्रीवर प्रि-हिट करावं. बेकिंग ट्रेमध्ये तुपाचा हात लावावा. त्यात तयार मिश्रणाचा एक ते दीड इंचाचा थर करावा. त्यावर बदामाचे काप घालावे. १५ ते२0 मिनिटं केक बेक करावा. केक गोल्डन ब्राऊन झाल्यावर तयार झाला, असं समजावं. केक गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.