साहित्य : दोन लीटर दूध, 3 संत्री, एक मोठा चमचा साखर, एक चमचा तुरटी, इलायची पूड, चार-पाच केशरच्या काड्या, सुकामेवा, संत्रींचे इसेन्स. कृती : दूधाला उकळावे, त्यात थोडी तुरटी टाकावी. उकळी आल्यावर त्यात साखर टाकून घट्ट होईस्तर उकळावे. संत्रीचे बारीक तुकडे करून त्यात टाकावे. सुकामेवा, केसर, इलायची व इसेन्स टाकून विविध आकारात कलाकंद कापून शितगृहात ठेवावे थंड कलाकंद सर्व्ह करावे.