गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By नई दुनिया|

केशरी भात

केशरी भात
ND
लागणारे जिन्नस :
2 वाट्या तांदूळ, 1 मोठा चमचा शुध्द तूप, 1 वाटी साखर, 2 चिमूट केशर, 1 चिमूट पिवळा रंग, 1/2 छोटा चमचा वेलची पूड, काजू, चारोळ्या, मनुके, 1/2 वाटी डाळींबाचे दाणे, 15-20 द्राक्षे.

करावयाची कृती :
तांदुळ मोकळे राहतील असे शिजवून घ्या. थंड झाल्यावर कढईत तूप गरम करा. त्यात रंग टाका. तांदुळ टाकून व्यवस्थित हलवून घ्या. साखर टाका आणि हालवत रहा. यात चारोळ्या, काजू, केशर, मनुके, वेलची पूड टाकून व्यवस्थित हलवून घ्या. नंतर गॅसवरून उतरवून त्यात डाळींब, द्राक्षे टाका आणि गरमागरम केशर भात सर्व्ह करा.