सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

गव्हाची खीर

सौ. प्रमिला

सडलेले गहू
साहित्य : 1 ग्लास सडलेले गहू, 1/2 ग्लास तांदूळ, गूळ, खसखस, जायफळ, वेलची, सुंठ चवीपुरते, मीठ.

कृती : सर्वप्रथम गहू पाण्याचा हात लावून सडून घ्या. आजकाल बाजारात चांगले सडलेले गहू मिळतात. सडलेले गहू व तांदूळ रात्री भिजत घाला. लोण्यासारखे मऊ भिजल्यावर त्यात गूळ घाला, थोडं दूध खसखस भाजून त्याची पूड, सुंठ, वेलची, जायफळ पावडर घाला व घोटा. शिजताना चवीपुरते मीठ टाका. सर्व्ह करताना काजू-बेदाणे टाकू शकता.