शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

गुलाल पोटली

साहित्य : 50 ग्रॅम मैदा, 2 चमचे तूप, 1/2 कप पिठी साखर, 1/4-1/4 कप बदाम, काजूचे काप, गुलकंद व खोबऱ्याचा बुरा, तळण्यासाठी तूप, खाण्याचा लाल-पिवळा रंग.

कृती : सर्वप्रथम मैद्यात लाल रंग, मोहन व पिठी साखर घालून दुधाने मळून घ्यावा. बदाम, काजू व खोबऱ्याचा बुरा एकजीव करावे. थोड्या मैद्यात पिवळा रंग घालून वेगळा मळून घ्यावा. नंतर त्या कणकेच्या पुरी सारख्या लांब लांब पट्ट्या कापाव्या. लाल मैद्याची लहान लहान पुरी तयार करावी व गुलकंदाचे मिश्रण ठेवून चारीबाजून मोदक सारखा आकार देऊन वरून पिवळ्या पट्ट्यांनी गुंडाळावे. तूप गरम करून त्यात त्या पोटल्या तळून घ्यावा.