साहित्य : अर्धा किलो गुळ, अर्धी वाटी खसखस, अर्धी वाटी तीळ, ५-६ वेलदोड्यांची पूड, १ चमचा खोबर्याचा किस, अडीच चमचा डाळीचे पीठ, २ वाट्या कणीक, १ वाटी मैदा, आणि २ लहान चमचे तूप असे सर्व साहित्य तयार ठेवा.
कृती : सर्वप्रथम कणिक, मैदा व अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ एकत्र करुन त्यात जरा जास्त मोहन घालून पोळ्यांसाठी पीठ भिजवून ठेवा. चांगला पिवळा गूळ किसून घ्या. तीळ, खसखस व खोबर्याचा कीस भाजून घ्या व नंतर त्यास कुटून घ्या. अडीच टेबलस्पून डाळीचे पीठ थोड्या तुपावर चांगले भाजून घ्या. वेलदोड्यांची पूड घालून सर्व एकत्र मळून घ्या. नंतर कणकेच्या दोन लाट्या जरा लाटून घ्या. त्यात गुळाच्या सारणाची मोठी गोळी घालून कडा दाबून, हलक्या हाताने पोळी लाटा. तव्यावर खमंग भाजा. गुळाच्या पोळ्या मात्र गारच चांगल्या लागतात. म्हणून अगोदरच करुन ठेवा. त्या थोड्याशा कडकच होतात व खूप दिवस टिकतात.