कृती : तांदूळ, हळकुंडाचा तुकडा व मेथ्या पाण्यात घालून 24 तास ठेवावे. नंतर हे साहित्य स्वच्छ धुऊन वाटावे. वाटताना पोहे धुऊन व खोबरे घालावे व सर्व एकत्र बारीक वाटावे. नंतर त्यात गूळ किंवा साखर घालून चांगले खाली वर ढवळून पाच सहा तास झाकून ठेवावे. पातेले मोठे घ्यावे व पीठ फार पातळ करू नये. चार-पाच तासाने पीठ आंबून फसफसून येईल. नंतर जाड लोखंडी तव्यावर तेल टाकून अंदाजे पाव इंच जाडीचे पीठ टाकून आंबोळी करावी. या आंबोळीला चांगली जाळी पडते. ही आंबोळी गरमच चांगली खावयास द्यावी.