तयार करण्याची कृती: सर्वप्रथम थंड दुधात कॅर्नफ्लोर आणि कोको पावडर चांगले मिक्स करून घ्या. उकळविण्यासाठी गॅसवर ठेवा. उकळवीत असताना त्यात दही टाकून सारखे हालवत राहा. हा सॉस घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवून घ्या. थंड होऊ द्या.
चॉकलेट आइसक्रीम थोडे फेटून घ्या. आइसक्रीमच्या भांड्यात 1/3 भाग आइसक्रीम टाकून पसरवून घ्या. वरून थंड चॉकलेट सॉस टाका.