साहित्य : पाव किलो खवा,अर्धा नारळ, एक वाटी मैदा, पाव किलो साखर, चिमटीभर सोडा, तूप.
कृती : साखरेचा पाक करून, त्यात नारळाचे खोवलेले खोबरे घालावे. खवा थोडा गरम करून पाकात टाकावा व ते मिश्रण थोडे शिजवावे. मिश्रण घट्ट झाले, की त्याचे पेढ्यांप्रमाणे गोळे करावेत. नंतर मैद्यात तूप व चिमटीभर सोडा घालून मैदा पाण्यात भिजवावा. भज्यांच्या पिठापेक्षा थोडा घट्ट भिजवावा. नंतरवर करून ठेवलेले गोळे या मैद्यात बुडवून मंद विस्तवावर तुपात तळून काढावेत.