कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवून घ्या व गरम गरम डावाने घोटून घ्या. दुसऱ्या पातेल्यात दूध उकळायला ठेवा. पाव हिस्सा दूध आटवून घ्या, घोटलेले पुरण घाला, साखर घाला, विलायची पूड घाला, केशर काड्या आणि काजू बदामाचे काप घाला, उकळी येऊ द्या. पौष्टिक खीर तयार आहे.