गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

लाहीचे लाडू

लाहीचे लाडू
ND
साहित्य : लाह्याचे मिक्सरवर बारीक पीठ करून घ्या. लाहीचे पीठ 3 वाटी, डाळ्याचे पीठ (मिक्सरवर डाळे बारीक दळून घ्या)1 वाटी, सुका मेवा जाडसर कुटून पाऊणवाटी, खोबर्‍याचा किस अर्धा वाटी, विलायची पूड लहान 1 चमचा, शुद्ध तूप दीड ते दोन वाटी अंदाज घेऊन पीठी सारख किंवा बुरा साखर असेल तर उत्तम 3 वाटी राहील.

कृती : प्रथम कढईत तूप गरम करून घ्या. त्या दाळवाचे पीठ व लाह्याचे पीठ घाला. हलवा, गॅस बंद करा. गरम कढईत थोडे परतून काढून घ्या. भाजण्याची गरज नाही. बुरा साखर व ड्रायफ्रूटचे काप व विलायची पूड घाला. खूप मळून घ्या व लाडू बांधा. पाचक लाह्याचेलाडू जास्त दिवस टिकतात. वृद्धांना नास्त्यासाठी देऊ शकता.