साहित्य : 3 ते 4 सफरचंद, 3 कप दूध आटलेले, 1/4 वाटी साखर, 1 चमचा केशर काड्या, 1/2 लहान चमचा वेलची पूड, काजू-बदाम काप, सजावटीसाठी चेरी.
कृती : सफरचंद सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. थोड्या दुधात सफरचंदाचे तुकडे परतून घ्यावे. थोडे मऊ झाल्यावर साखर घालावी. आटवलेले दूध घालावे. विलायची पूड व काजू-बदामाचे काप घालावे व गॅस बंद करावा. जास्त उकळण्याची गरज नसते. थंड झाल्यावर चेरीने सजवून बाऊलमध्ये खायला द्यावे.