बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (07:25 IST)

Teacher's Day Wishes In Marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
 
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या 
 
दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम. 
 
तुम्ही शिकवलं वाचायला, तुम्हीच शिकवलं लिहायला, गणितही शिकलो तुमच्याकडून आणि भूगोलही शिकलो तुमच्याकडून वारंवार नमन करतो तुम्हाला. शिक्षक 
 
दिनाच्या शुभेच्छा स्वीकारा. 
 
जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या 
 
कोटी कोटी शुभेच्छा. 
 
आज तुमच्यामुळे माझं भविष्य सोनेरी आहे मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. 
 
माझ्या जीवनाची प्रेरणा आहे, तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात. तुम्हीच माझ्या जीवनाचा प्रकाशस्तंभ आहात. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
 
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षकदिनाच्या 
 
हार्दिक शुभेच्छा...
 
जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
 
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. 
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. 
जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. 
आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. 
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
 
गुरूची उर्जा सूर्यासारखी, 
विस्तार आकाशासारखा...
गुरूंचं सान्निध्य आहे जगातील सर्वात मोठी भेट...
तेच आहेत जगातील अनेक व्यक्तीमत्त्वांचे शिल्पकार.
 
गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण. 
 
कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे. 
तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात. 
देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार. 
 
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात.
या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
अक्षर-अक्षर आम्हाला शिकवून शब्दांचा अर्थ सांगितला 
कधी प्रेमाने तर कधी ओरडून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला 
पृथ्वी म्हणते आकाश म्हणतं फक्त एकचं गाणं 
गुरू तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळलं हे जगणं.... 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
दिलं आम्हाला ज्ञानाचं भंडार...
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार...
आम्ही आभारी आहोत त्या गुरूंचे...
ज्यांनी आम्हाला घडवलं आज.
माझ्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाला शतशत नमन