मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (11:05 IST)

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी सोपे उपाय

घर लहान असो वा मोठं पूर्णपणे आरामदायक, मजबूत आणि शांत असले पाहिजे. हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण घराच्या बांधकामाकडे आणि त्याचा सजावटीकडे पूर्ण लक्ष देत असाल जेणेकरून वीट आणि दगडांचे घर ज्याला आपण आपले घर असे म्हणतो आकर्षक आणि वास्तू दोष मुक्त होऊ शकेल. अशा घरात राहिल्याने घरातील सर्व सदस्यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी काही उपाय आम्ही येथे मांडत आहोत.
 
१  घरात कचरा, जुनाट फर्निचर, रद्दी आणि विजेच्या तुटलेल्या वस्तू गोळा करू नयेत. घरात ताण तणाव वाढतो. फाटके जोडे, मोजे, छत्री, शक्यतो लवकरात लवकर घरातून बाहेर काढावे. अशा वस्तू घरात असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. समस्यांमध्ये वाढ होते.    
 
२ घरात जाळे लागू देऊ नका याने राहू ग्रहाचा त्रास होतो. समस्या वाढतात. नकारात्मक ऊर्जा पसरते. 
 
३ घराच्या कोपऱ्यात कधीही ओलसरपणा असू नये. घराच्या कोपऱ्यात रात्री अंधार राहू नये. संध्याकाळी किमान 15 मिनिटे तरी घरात दिवे लावून ठेवावे. विजेचे उपकरण, टीव्ही, संगणक, मुख्य मीटर, आग्नेय दिशेस असावे. आर्थिक लाभ मिळतील.
 
४ घरातील मतभेद टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका. देवांचा चेहरा अमोर - समोर येईल अशा प्रकारे फोटो लावू नये. देवी-देवतांचे चित्र कोपऱ्यात ठेवू नये. कोर्ट-कचेरी मध्ये अडकण्याची शक्यता असते.
 
५  मिठाच्या पाण्याने घरात लादी पुसली पाहिजे. ज्याने नकारात्मक उर्जेचा नाश होतो. वास्तू दोष दूर होतो.
 
६ घरातील वडीलधाऱ्यांना वाकून नमस्कार केला पाहिजे. कार्ये सहज होतात. यश मिळतं. वास्तू दोष दूर होतो.