शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (17:20 IST)

घोड्याची नाल दारावर का लावली जाते, त्याचे फायदे जाणून घ्या

तुम्ही घोड्याच्या नालबद्दल बरेच काही ऐकले असेलच. वास्तविक हा एक लोखंडाचा यू शेपचा सोल असतो ज्याच्या मदतीने घोड्याला चालण्यास आणि पळण्यास त्रास होत नाही. वास्तुच्या मते, काळा घोड्याची नाल फार शुभ मानण्यात आली आहे आणि त्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वार किंवा दिवाणखाण्याच्या प्रवेश दारावर बाहेरच्या बाजूला लावले जाते. परंतु हे काय होते हे आपल्याला माहिती आहे काय? म्हणून आज आम्ही तुम्हाला घोड्याच्या नालबद्दल सांगत आहोत
 
- असे मानले जाते की जर काळा घोड्याच्या नालला काळ्या कपड्यात लपेटून धान्यात ठेवले तर कधीही धान्याची कमतरता भासणार नाही. म्हणजे बरकत कायम आहे.
 
-  असेही म्हटले जाते की काळ्या घोड्याची नाल काळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास संपत्ती वाढते.
 
-  असा विश्वास आहे की घरात घोड्याची नाल स्थापित केल्याने एखाद्याला जादूटोणा, नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.  
 
-  असे म्हटले जाते की एखाद्याला धावणार्‍या घोड्याच्या पायातून मिळालेली नाल घरात आणून त्यास योग्य ठिकाणी ठेवले तर त्या व्यक्तीचे दुर्दैव दूर होते आणि आयुष्यात आनंद येतो.
 
-  दुकानाबाहेर काळ्या रंगाची नाल लावल्याने विक्री वाढते.
 
-  जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर, उत्तर-पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने लावावा. घराच्या मुख्यदारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते.  
 
- ज्योतिषानुसार काळ्या घोड्याच्या पायावर शनिचा विशेष प्रभाव असतो. नाल लोखंडापासून बनलेली असते, लोहा शनीची धातू आहे आणि शनिचा काळा रंग आहे आवडता रंग आहे. घोड्याची नाल असल्याने शनीचा प्रकोप संपुष्टात येतो.