शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (15:03 IST)

पक्ष्यांना दाणा खाऊ घालत असाल तर ह्या चुका करू नका

वास्तू शास्त्रानुसार आम्ही आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी बरेच उपाय करत असतो. पण एखाद्या वेळेस असे ही होते की न कळत आमच्याकडून काही चुका होऊन जातात. अशीच एक चूक आम्ही पक्ष्यांना दाणा देताना ही करतो. खरं तर पक्ष्यांना दाणे देणे हे शुभ कार्य समजले जाते, पण यात थोडीही चूक झाली तर आम्हाला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.   
 
ज्‍योतिष आणि वास्तू शास्त्रात जे लोक पक्ष्यांना दाणे खाऊ घालतात त्यांच्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा असते. जास्त करून लोक घराच्या छतावर किंवा बाल्कनीत पक्ष्यांना दाणे टाकतात पण फार कमी लोकांना माहीत आहे की दाणा टाकल्याने नुकसान देखील होऊ शकते. पक्ष्यांना दाणे टाकणे शुभ असत पण त्या वेळेस करण्यात आलेल्या चुकांमुळे व्यक्तीला नुकसान देखील होण्याची शक्यता असते. तुम्ही जसेच दाणा टाकता पक्षी खाण्यासाठी पोहोचतात. या पक्ष्यांमध्ये सर्वात सामान्य म्हणजे कबुतर असतो. कबुतराचे दाणा खायला येणे फारच शुभ मानले जाते. कबूतराला ज्योतिषाप्रमाणे बुध ग्रह मानला जातो. काही लोक दाणा टाकण्यासाठी छतावर जातात. छताला राहूचे प्रतीक मानले गेले आहे. जेव्हा कबुतर दाणा खाण्यासाठी छतावर येतात तेव्हा बुध आणि राहू ग्रह एकत्र येतात. त्याच बरोबर ज्या जागेवर पक्षी दाणा खातात ती जागा घाण ही होते. जर तुम्ही जागा स्वच्छ ठेवत असाल तर काहीच त्रास नसतो पण ही जागा अस्वच्छ असेल तर त्याचे अशुभ प्रभाव बघायला मिळतात. या स्थितीत घरात राहणार्‍या लोकांवर राहू ग्रह भारी पडतो जो फारच अशुभ असत.