बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (09:51 IST)

घरात तुळशीचे रोपटं असल्यास या गोष्टी लक्षात असू द्या

हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्त्व आहे. घरात तुळशीचे रोपटं ठेवणं आणि त्याला पाणी देणे आणि त्याची उपासना करणे शुभ मानले गेले आहे. तुळशीचं रोपटं घरात लावण्याच्या पूर्वी बरेच कायदे लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
 
1 तुळस नेहमीच घराच्या अंगणात किंवा घराची पूर्वोत्तर किंवा उत्तर दिशेला ठेवावी. ही दिशा ईश्वराची मानली गेली आहे. या दिशेला तुळस ठेवल्यास सर्वात जास्त शुभ प्रभाव दिसून येतात.
 
2 भगवान शिव आणि गणपतीच्या उपासनेच्या वेळी तुळस वापरणं निषिद्ध मानले गेले आहे.
 
3 शास्त्रानुसार रविवारी, एकादशीला आणि सूर्य किंवा चंद्र ग्रहणाच्या वेळी तुळशीला हात लावणे निषिद्ध मानले गेले आहे.
 
4 कारण नसताना तुळस तोडणे, तुळशीचा नायनाट करण्याप्रमाणे असतं.
 
5 घरात तुळशीचे रोपटं असल्यास दररोज त्याला पाणी घालावं आणि संध्याकाळी दिवा लावावा. त्याची जोपासना करावी.