सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 15 मार्च 2018 (15:03 IST)

परदेशात जायचे असेल तर वास्तूनुसार हे उपाय करून बघा

जीवनात प्रत्येकाला यश हवे असते. बर्‍याच लोकांची इच्छा असते की परदेशात जाऊन काही नवीन करण्याची संधी मिळायला पाहिजे. काही लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात तर बर्‍याच लोकांनी ही संधी मिळत नाही. वास्तूत सांगण्यात आलेले काही सोपे उपाय परदेशात जाऊन तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यास मदत करतात. तर जाणून घ्या याबद्दल.  
 
वास्तुशास्त्रानुसार परदेशात जाण्यासाठी वायू कोणाला ऊर्जावान बनवायला पाहिजे. घरातील नार्थ-ईस्ट, ईशान कोपर्‍यात एक आरसा लावायला पाहिजे. वायू कोणात एका काचेच्या वाटीत कापूर भरून ठेवल्याने सर्व कामं सोप्यारित्या पार पडतात. दररोज हनुमान चालीसाचा पाठ करावा.  
 
लकड्याच्या पाटावर लाल किंवा पांढरे वस्त्र पसरवून लक्ष्मीला स्थापित करावे. पश्चिमेकडे तोंड ठेवून देशी तुपाचा दिवा लावायला पाहिजे. शंखावर केसर पाण्यात घोळून त्याचे स्वस्तिक बनवायला पाहिजे आणि लक्ष्मीजवळ स्थापित करावे. पूजा केल्यानंतर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीला मंदिरात ठेवायला पाहिजे आणि शंखाला कपड्यात लपेटून अशा जागेवर ठेवावे जेथे कोणाचा हात लागणार नाही. घरातील उत्तर-पश्चिम दिशेला स्वच्छ ठेवावे. घरात धूळ इत्यादी जमा होऊ देऊ नये.