शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्वप्नात ह्या 4 वस्तू दिसल्या तर समजा तुमच्यावर संकट येणार आहे

bad dreams and meaning
आम्हा सर्वांना स्वप्न येतात, त्यात काही चांगले असतात तर काही वाईट. चांगले स्वप्न भविष्यात आमच्यासाठी शुभ संकेताचा इशारा करतात तर वाईट स्वप्न आम्हाला भविष्यात होणार्‍या त्रासांचे संकेत देतात. आम्ही तुम्हाला स्वप्नांच्या काही वाईट संकेतांबद्दल सांगत आहोत, जे बघितल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
स्वप्नात जर तुम्ही आपल्या घरात असलेल्या वस्तूंची तोडफोड करताना बघाल तर येणार्‍या काळात तुम्ही फार मोठ्या अडचणीत पडू शकता.  
 
स्वप्नात जर तुम्ही स्वत:ला घाण पाण्यात अंघोळ करताना दिसाल तर हे दुर्भाग्याचे सूचक आहे.  
 
जर स्वप्नात तुम्हाला मांजरींचे भांडण दिसतील तर समजून घ्या की तुमच्यासोबत कोणी छलकपट आणि विश्वासघात करणार आहे.  
 
ज्या व्यक्तीला स्वप्नात मोठ्या प्रमाणात सोनं चांदी घेताना दिसेल तर त्याला येणार्‍या भविष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.