ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे राशीला वास्तुशास्त्रातही महत्त्व प्राप्त झाले आहे. राशीनुसार व्यक्ति आपल्या राहत्या घराची सजावट शकतो.
राशीनुसार घराची सजावट-
मेष:
मेष राशीच्या व्यक्तीसाठी लाल, गुलाबी व भगवा रंग शुभ आहे. घर सजवताना याच रंगाची बेड कव्हर, चादर, कपडे, आभूषणे, पडद्यांसाठी वापरा. परंतु, दक्षिण-पश्चिम कोपर्यांकडे वजनदार फर्निचर ठेवले पाहिजे.
वृषभ:
वृषभ राशी व्यक्तीच्या घराच्या भिंतींसाठी भडक रंगाचा वापर करू शकतात. सोफा कव्हर, पिलो कव्हर ही त्याच रंगाचे असणे शुभ असते. या राशीच्या व्यक्तिंसाठी दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेला वजनदार फर्निचर ठेवणे लाभदायी असते. असे केल्याने घरात शांतता व सुरक्षितता नांदते.
मिथून:
मिथून राशीच्या व्यक्तीला फिकट हिरवा, निळा व लाल रंग शुभ असतो. खोल्यांना ते हे रंग देऊ शकतात. या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ असते. त्यांच्यासाठी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला कमी वजनाचे फर्निचर ठेवणे फायदेशीर असते.
कर्क:
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा, क्रिम रंग शुभ आहे. कारण हे रंग चंद्रासारखे दुधाळ, पांढरे असतात. मात्र कर्क राशी ही जल तत्त्व असल्याने खोलीच्या उत्तर-पूर्व (ईशान) दिशेच्या कोपर्यात पाण्याने भरलेला माठ किंवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे.
सिंह:
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी पांढरा, चमकणारा पिवळा रंग शुभ आहे. या रंगाचे कपडे किंवा सजावटीच्या वस्तू ते घरात ठेवू शकतात. अशा व्यक्तींसाठी घरातील कोपरा महत्त्वपूर्ण असतो. दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला किचन असावे कारण या राशीच्या व्यक्तीची आगी संबंधी अपघात होऊ शकतो.
कन्या:
कन्या राशीच्या व्यक्तीसाठी फिकट हिरवा, निळा व लाल रंग शुभ आहे. या रंगाचे कपडे परिधान करावे. तसेच घर सजवताना या रंगाच्या वस्तूंचा अधिक वापर केला पाहिजे. खोलीच्या दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) कोपर्यात वजनदार फर्निचर किंवा इतर सामान ठेवला पाहिजे. असे केल्याने घरात आंनदी वातावरण नांदते.
तूळ:
कुठलाही चकणारा रंग तूळ राशीसाठी शुभ आहे. घरातील पडदे, सोफा कव्हर तसेच पिलो कव्हरसाठी हा रंग वापरू शकता. त्यांच्यासाठी उत्तर-पश्चिम (वायव्य) कोपरा शुभ असल्याने कमी वजनाच्या वस्तू किंवा सजावटीच्या वस्तू ठेवू शकता. असे केल्याने त्यांच्या जीवनात कुठल्याच समस्या उद्भवत नाहीत.
वृश्चिक:
वृश्चिक राशीसाठी लाल, गुलाबी व भगवा रंग शुभ आहे. या राशीच्या व्यक्तीने मोठ्या प्रमाणात याच रंगाची कपडे, दागिने परिधान केली पाहिजेत. महिला या रंगाची टिकली कपाळावर लावू शकतात. उत्तर-पश्चिम (ईशान्य) दिशेला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. चांदीच्या घागर पाण्याने भरून तिला मोत्याच्या माळांनी सजवले पाहिजे. असे केल्याने संततीचे शिक्षण, यश व समृध्दीसाठी सहकार्य मिळते.
धनू:
धनू राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ आहे. अग्नी किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ नेहमी दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला ठेवावीत. तसेच आग्नेय दिशेच्या कोपर्यात दररोज दिवा प्रज्ज्वलित करून ठेवला पाहिजे.
मकर:
मकर राशी व्यक्तीला गळद निळा, हिरवा व काळा शुभ आहे. या रंगाची चादर, सोफा कव्हर, पडदे लाभदायी असतात. वजनदार फर्निचर किंवा इतर सामान दक्षिण दिशेच्या कोपर्यात ठेवले पाहिजे.
कुंभ:
कुंभ राशीसाठी गळद निळा, हिरवा व काळा रंग शुभ आहे. या रंगाचा उपयोग घराच्या भिंती, सजावटीच्या वस्तुंसाठी करू शकतो. असे केल्याने यशाचा मार्ग सापडतो. कमी वजनाचा सामान किंवा वस्तु नेहमी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला ठेवल्या पाहिजेत.
मीन:
मीन राशीला पिवळा रंग शुभ आहे. त्यामुळे घर सजवताना जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर केला पाहिजे. घराच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपर्यात पाण्याने भरलेला माठ अथवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे. त्याने घरात लक्ष्मी नांदेल.