रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:41 IST)

मुख्य दार असं असावं, घरात नक्की प्रवेश करेल देवी लक्ष्मी

घराच्या मुख्यदारावर पंचधातूने बनवलेल्या स्वस्तिकाची प्राणप्रतिष्ठा करावी. ह्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
 
घराचे मुख्यदार स्वच्छ असले पाहिजे मुख्य द्वार जेवढे स्वच्छ असणार घरात लक्ष्मीचा वास होतो. मुख्यदारावर स्वस्तिक, ॐ, शुभ-लाभ सारखे मांगलिक चिन्ह असावे.
 
दक्षिण किंवा उत्तरमुखी दारावरच गणपतीचे प्रतीक लावावे.
 
रात्री झोपताना डोकं नेहमी दक्षिणी असावे. उत्तर दिशेस नको. अनिद्राचा त्रास होतो आणि पचन तंत्र प्रभावित होते.
 
स्वयंपाक करताना गृहिणीने पूर्वमुखी होऊन अन्न शिजवावे. अन्न सुपाच्य आणि स्वादिष्ट बनते तसेच पूर्व मुखी जेवण्यास बसल्याने व्यक्तीच्या पचनतंत्रास वृद्धी होते.