शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

जन्मपत्रिकेत असलेले दोष वस्तूने दूर करा....

व्यक्तीच्या जीवनात बर्‍याचदा वेग वेगळ्या ग्रहांचे चांगले-वाईट योग बनतात, ज्यामुळे त्यांचे जीवन प्रभावित होत असते. वास्तू शास्त्रानुसार खाली दिलेले उपाय करून तुम्ही या ग्रहांना शांत करू शकता -

जर जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ असून त्याचा कुप्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत असेल तर पलंगाच्या खाली तांब्याच्या पात्रात पाणी किंवा उशीच्या खाली लाल चंदन ठेवावे.

जर चंद्र ग्रहामुळे तुम्ही पीडित असाल तर चांदीच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा चांदीचे आभूषण धारण करावे.

जर तुमच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल तर पलंगाच्या खाली तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा सोन्या-चांदी
मिश्रित आभूषण उशीच्या खाली ठेवावे.

बुध ग्रहाने त्रासले असाल तर उशीच्या खाली सोन्याचे दागिने ठेवावे.

गुरुमुळे तुम्ही परेशान असाल तर पलंगाच्या खाली पितळच्या भांड्यात पाणी किंवा पिवळ्या कपड्यात हळकुंड बांधून
उशीच्या खाली ठेवावे.

शुक्र ग्रहाचा त्रास असेल तर चांदीची मासोळी बनवून तिला उशीच्या खाली किंवा पलंगाचा खाली चांदीच्या पात्रात पाणी ठेवावे.

शनी ग्रहामुळे तुम्ही हैराण परेशान असाल तर लोखंडाच्या पात्रात पलंगाच्या खाली पाणी ठेवावे किंवा उशीच्या खाली लोखंड किंवा नीलम ठेवावे.

हे उपाय केल्याने तुम्ही नक्कीच ग्रहांच्या कुप्रभावाने स्वत:चा बचाव करू शकता.