शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (09:34 IST)

Vastu Tips : आपण ही लावा घरात हा चमत्कारी Plant , बदलेल तुमचे नशीब

वास्तुशास्त्रातील झाडे आणि वनस्पतींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यापैकी काही वनस्पती घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात, तर अशी काही वनस्पती आहेत ज्यामुळे घरात पैशाची कमतरता नसते. अशीच एक वनस्पती म्हणजे मयूर शिखा वनस्पती. वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ही वनस्पती मयूरच्या शिखासारखी दिसते, म्हणून याला मयूर शिखा असे म्हणतात. ही वनस्पती वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. ज्याला बंगालीमध्ये लाल मोरग या मोरगफूल म्हणतात, त्याचप्रमाणे तेलगूमध्ये मायरक्षिपा आणि ओडियातील मयूर चुरिया असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव एक्टीनप्टेरीडेसी आहे आणि इंग्रजीमध्ये याला पीकॉक्स टेल असे म्हणतात. ही वनस्पती देखील कोंबडीच्या शिखासारखी दिसते. ही वनस्पती सहज सापडते. वास्तुशास्त्रानुसार घरात हा रोप लावल्यास संपत्ती वाढते आणि वास्तुदोष संपतो. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला घरी मोर शिखाचे रोप लावण्याचे चमत्कारिक फायद्यांविषयी सांगू  -
 
•  मयूर शिखाचे रोप पाहण्यात फराच सुंदर असतो. हा पौधा आपण आपल्या घराच्या आत किंवा बागेत लावू शकता. ही वनस्पती आपल्या घर आणि बागेच्या सौंदर्यात वाढ करते.  
 
• वास्तुशास्त्रानुसार, मयूर शिखा वनस्पती वास्तू दोष रोखण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.  वास्तुशास्त्रानुसार घरात मयूरशिखाची रोप लावल्याने  घरातील नकारात्मकता दूर होते.
 
•  पितृदोष रोखण्यासाठी मयूर शिखा वनस्पती देखील खूप फायदेशीर आहे. असा विश्वास आहे की घरी ही वनस्पती लावल्याने पितृदोष दूर होतो. आपण याचे रोप घरात किंवा बागेत लावू शकता.
 
•  वास्तुशास्त्रानुसार मयूर शिखाचा पौधा घरात लावल्याने वाईट आत्मेचा प्रवेश घरात होत नाही. 
 
• आयुर्वेदातही, मयूर शिखा वनस्पतीला अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर असे वर्णन केले आहे. आयुर्वेदानुसार त्याची पाने व फुले भाजी म्हणूनही वापरली जातात. मयूर शिखा ह्या वनस्पतीला  अॅसिड, कफ-पित्त, ताप आणि मधुमेहरोधी यात फायदेशीर मानली जाते.