बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

सूर्यानुसार काही वास्तू उपाय

वास्तू शास्त्र पंच तत्त्वांवर आधारित आहे. हे पंच तत्त्व है अग्नी, वायू, पाणी, पृथ्वी आणि आकाश. सूर्य देखील अग्नीचाच  स्वरूप आहे. म्हणून सूर्य वास्तुशास्त्राला प्रभावित करतो. यासाठी गरजेचे आहे की सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत दिशा व वेळेनुसारच भवन निर्माण आणि तुमची दिनचर्येचे निर्धारण करा. वास्तू शास्त्रानुसार जाणून घ्या सूर्योदयापासून तर सूर्यास्तपर्यंत आम्हाला कोणत्या वेळेस काय काम करायला पाहिजे-   
 
1. वास्तू शास्त्रानुसार मध्य रात्रीपासून पहाटे 3 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या उत्तरी भागात असतो. ही वेळ अत्यंत गोपनीय असते. ह्या वेळेस किंमती वस्तू आणि दागिन्यांना गुप्त जागेवर ठेवू शकता.    
 
2. सूर्योदयाअगोदर रात्री 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त असतो. या वेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर पूर्वी भागात असतो. ही वेळ चिंतन मनन व अध्ययनासाठी योग्य असते.  
 
3. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या पूर्वीकडे असतो. म्हणून घराची निर्मिती अशा प्रकारे करा की त्यात सूर्याचा पर्याप्त प्रकाश घरात येईल.  
 
4. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सूर्य पृथ्वीच्या दक्षिण पूर्वेकडे असतो. ही वेळ स्वयंपाक तयार करण्यासाठी उत्तम असते. स्वयंपाकघर आणि स्नानघर (बाथरूम) ओले असतात. हे अशा जागेवर असायला पाहिजे जेथे सूर्यप्रकाश पर्याप्त मात्रेत येत असेल, तेव्हाच ही जागा वाळलेली आणि स्वास्थ्यकर असू शकते.  
 
5. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत विश्रांती काळ (आरामाची वेळ) असतो. सूर्य जेव्हा दक्षिणेत असतो, म्हणून झोपण्याची खोली याच दिशेत असायला पाहिजे. 
 
6. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अभ्यास आणि काम करण्याची वेळ असते आणि सूर्य दक्षिण पश्चिम भागात असतो. म्हणून ही दिशा अध्ययन कक्ष (स्टडी रूम) किंवा पुस्तकालय (लाइब्रेरी) साठी उत्तम आहे.  
 
7. संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंतची वेळ जेवण करणे, बसणे आणि अभ्यासाची असते. म्हणून घराच्या पश्चिमी कोपरा भोजन किंवा बैठक कक्षेसाठी उत्तम असतो.  
 
8. संध्याकाळी 9 ते मध्य रात्रीच्या वेळेस सूर्य घराच्या उत्तर पश्चिमेत असतो. ही जागा शयन कक्षा (बेडरूम)साठी उपयोगी आहे.