Akshaya Tritiya 2025 अक्षय तृतीया विशेष नैवेद्य थाळी
आंब्याचा रस
साहित्य-
हापूस आंबे- तीन
चवीनुसार साखर
वेलची पूड
दूध
केशर धागे
कृती-
सर्वात आधी आंबे स्वच्छ धुवून सोलून घ्या आणि त्यांचा गर काढा. आंब्याचा गर, साखर, वेलची आणि दूध ब्लेंडरमध्ये मिसळा आणि ब्लेंड करा. व थोड्यावेळ फ्रिज मध्ये ठेवा. तर चला तयार आहे आपला आंब्याचा रस रेसिपी.
पुरी
साहित्य
गव्हाचे पीठ- दोन कप
रवा- एक टीस्पून
मीठ - अर्धा टीस्पून
तेल
गरजेनुसार पाणी
कृती-
सर्वात आधी एक मोठी परात घ्या. त्यात गव्हाच्या पिठात रवा, मीठ आणि थोडे तेल घाला आणि पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. आता छोटे गोळे बनवा आणि गोल पुर्या बनवा. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
कैरी भात
साहित्य-
शिजवलेला भात -तीन कप
कैरी- दोन किसलेली
तेल - तीन चमचे
मोहरी
जिरे
सुक्या लाल मिरच्या
कढीपत्ता
हिंग
हळद
कोथिंबीर
नारळ पावडर
कृती-
सर्वात आधी गॅस वर पॅन ठेऊन तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद, सुक्या लाल मिरच्या घालून परतवून घ्या. आता आणि त्यात मसाला घाला. नंतर किसलेली कैरी घाला आणि दोन मिनिटे शिजवा. आता भात आणि मीठ घाला. व परतवून घ्या. आता हिरव्या कोथिंबीर आणि नारळ पावडरने गार्निश करा. तर चला तयार आहे कैरी भात रेसिपी.
काकडीची कोशिंबीर
साहित्य-
काकडी- दोन
शेंगदाण्याची पूड
हिरव्या मिरच्या
धणे पूड
नारळ किस
लिंबू
दही
मोहरी
जिरे
हिंग
कढीपत्ता
कृती -
सर्वात आधी काकडी स्वच्छ धुवून ती सोलून ति बारीक चिरून घ्या. आता त्यामधील पाणी काढून त्यामध्ये दाण्याचा कूट घालावा. तसेच वरील साहित्याचा तडका बनवून वर फोडणी घाला. आता तयार तयार आहे काकडीची कोशिंबीर रेसिपी.
बटाट्याची भाजी
साहित्य-
उकडलेले बटाटे- चार
मोहरी
जिरे
कढीपत्ता
हिरवी मिरची
हळद
हिंग
मीठ
साखर
लिंबाचा रस
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी बटाटे कापून घ्या. आता पॅन ठेऊन त्यामध्ये तेल घालावे. व वरील साहित्य टाकून फोडणी तयार करावी आता फोडणीनंतर त्यात बटाटे घाला. नंतर लिंबाचा रस घाला. आता वरून कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली बटाटयाची भाजी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik