मुलांसाठी हा एक आरोग्यदायी आणि चविष्ट रेसिपी; पौष्टिक बीटरूट-सफरचंद जेली
साहित्य-
बीटरूट – १५० ग्रॅम
सफरचंद – २०० ग्रॅम
गाजर – २५० ग्रॅम
संत्र – १०० ग्रॅम
डाळिंब – ६० ग्रॅम
पाणी – ३५० मिली
लिंबाचा रस – १ मोठा चमचा
मध – १ छोटा चमचा
अगर-अगर पावडर – १ छोटा चमचा
कृती- सर्वत आधी, १५० ग्रॅम बीटरूट, २०० ग्रॅम सफरचंद आणि २५० ग्रॅम गाजर बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्या. आता, हे सर्व ब्लेंडरमध्ये घालून त्यात १०० ग्रॅम संत्र, ६० ग्रॅम डाळिंब आणि ३५० मिली पाणी टाका आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत ब्लेंड करा. हे मिश्रण एका भांड्यात गाळून घ्या. त्यात १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ छोटा चमचा मध आणि १ छोटा चमचा अगर-अगर पावडर घालून चांगले फेटून घ्या. हे मिश्रण एका पातेल्यात ओता आणि ३-४ मिनिटे उकळवा. गॅस बंद करा आणि मिश्रण ५ मिनिटे थंड होऊ द्या. ते एका ट्रे किंवा डिशमध्ये ओता आणि १५ मिनिटे सेट होऊ द्या, त्यानंतर ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. सेट झाल्यावर, ते इच्छित आकारात कापा आणि मुलांना सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: बीटरूट बर्फी रेसिपी
