मंगळवार, 18 मार्च 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

झटपट बनणारी रेसिपी बेसन अप्पे

Besan Appe
साहित्य-
बेसन - एक कप
दही - अर्धा कप
कांदा -एक बारीक चिरलेला 
हिरवी मिरची - एक 
आले - किसलेले 
हळद -अर्धा टीस्पून
लाल तिखट - एक टीस्पून
जिरे पूड - अर्धा टीस्पून
हिंग  
सोडा - अर्धा टीस्पून
चवीनुसार मीठ
 तेल
पाणी 
कृती-
सर्वात  एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घ्या. आता  त्यात दही, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आले किंवा आल्याची पेस्ट घाला.
यानंतर हळद, लाल तिखट, जिरेपूड आणि हिंग घाला. तसेच, त्यात चवीनुसार मीठ घाला. आता हे सर्व पदार्थ चांगले मिसळा. आता मध्यम गॅसवर अप्पे पॅन गरम करून त्यात थोडे तेल घाला. आता एक चमचा पीठ घ्या आणि ते पॅनमधील छिद्रांमध्ये ओता आणि चांगले पसरवा. नंतर आप्पे सोनेरी तपकिरी होईपर्यंत शेकून घ्या.  
तयार बेसनाचे आप्पे एका प्लेट मध्ये काढा. तसेच हिरव्या चटणी सोबत नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik