स्वादिष्ट बेसन भुर्जी रेसिपी
साहित्य-
बेसन - एक वाटी
कांदा - एक
टोमॅटो - एक
हिरवी मिरची- दोन
कोथिंबीर
हळद - अर्धा चमचा
तिखट - अर्धा चमचा
मीठ
जिरे - अर्धा चमचा
तेल - दोन चमचे
पाणी - एक कप
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये बेसन चाळून घ्यावे. आता त्या बेसनमध्ये हळद, तिखट, पाणी आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये जिरे घालावे. तसेच टोमॅटो घालावे. आता या मध्ये कांदा आणि हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. नंतर तयार बेसन घोळ कढईमध्ये घालावा.हे मिश्रण लहान गॅस ठेऊन हलवत राहावे. जो पर्यंत हे घट्ट होत नाही. घट्ट झाले की भुर्जी बनेल. तर चला तयार आहे आपली पनीर भुर्जी रेसिपी, पराठा किंवा पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik